कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:04+5:302021-02-15T04:31:04+5:30
चोरट्यांचा शेतीसाहित्यावर डोळा दुसरबीड : येथे सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे गावाबरोबर शेतातील साहित्याकडेही लक्ष केंद्रित करीत ...
चोरट्यांचा शेतीसाहित्यावर डोळा
दुसरबीड : येथे सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे गावाबरोबर शेतातील साहित्याकडेही लक्ष केंद्रित करीत आहेत. मागील आठवड्यात शेतातून चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेल्या होत्या. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. चोरांनी आता शेतातील साहित्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
‘माझी वसुंधरा अभियाना’ला गती द्या
सिंदखेड राजा : निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने पंचायत समितीमध्ये ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत अधिकारी-कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. प्रत्येक नागरिकाला सहभागी करून ‘माझी वसुंधरा अभियाना’ला गती देण्याचे आवाहन पंचायत समितीकडून शनिवारी (दि. १३) करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ‘हरित शपथ’ घेण्यात येत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका
दुसरबीड : परिसरात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे गहू पिकाचे नुकसान होत आहे.
नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
किनगाव राजा : २३ नाेव्हेंबरपासून शासनाने नववी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यानुसार शाळा चालू झाल्यानंतर सुरुवातीला विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते. आता परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
२४ पॉझिटिव्ह
बुलडाणा : रविवारी आलेल्या अहवालानुसार बुलडाणा शहरात २४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गत काही दिवसांपासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
गणवेशाची प्रतीक्षा
जानेफळ : एक ते चारच्या प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचा प्रश्नही रखडला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची प्रतीक्षा आहे.
दुचाकीचालकास दंड
बुलडाणा : वाहतूक नियम मोडणाऱ्या एका दुचाकी चालकास २०० रुपये दंड केल्याची घटना रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी घडली. दिवसभर पोलीस प्रत्येक चाैकामध्ये तैनात होते. अनेकांवर कारवाई झाली.
प्रवासी वाढले
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामधून सध्या दररोज २३८ बसफेऱ्या धावतात. त्यामधून दिवसाला जवळपास ३० हजार प्रवाशी एस.टी.ने प्रवास करीत असून प्रवासीसंख्या वाढली आहे.