ग्रामसेवकांचे आंदोलन मागे

By admin | Published: July 17, 2014 11:01 PM2014-07-17T23:01:14+5:302014-07-18T00:00:18+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ८00 ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.

Behind the movement of Gramsevaks | ग्रामसेवकांचे आंदोलन मागे

ग्रामसेवकांचे आंदोलन मागे

Next

बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी २ जुलैपासून कामबंद आंदोलन केले होते. राज्य शासनाने १६ जुलै रोजी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर केल्या. त्यामुळे हे आंदोलन मागे घेतले. जिल्ह्यातील ८00 ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, या संघटनेसोबत शासनाची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामसेवक गणेश पायघन, अरविंद टेकाळे, राजरत्न जाधव, गुळवे, मानवतकर, शेळके, प्रमोद वाघ, काकडे, धंदरे, राऊत आदींनी फटाके फोडले.

Web Title: Behind the movement of Gramsevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.