घरकुलापासून लाभार्थी वंचित
By admin | Published: December 13, 2014 12:14 AM2014-12-13T00:14:59+5:302014-12-13T00:14:59+5:30
लोणार तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिका-याच्या आदेशाला केराची टोपली.
लोणार (बुलडाणा): समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास आणि इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांंंची अंतीम निवड करण्यासाठी खर्या लाभार्थ्यांंना ५ हजार रुपये लागत असल्याची माहिती आहे. त्यावरुन जिल्हाधिकारी आणि उपमुख्यकार्यपालन अधिकारी जि.प. बुलडाणा यांनी पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन ५ डिसेंबर पर्यंंंत अहवाल पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना १ डिसेंबर रोजी दिले होते. मात्र लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रणदिवे यांनी जिल्हाधिकार्यांच्या पत्रास केराची टोपली दाखवून याप्रकरणी कोणतीही चौकशी न करता दोषी कर्मचार्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे.दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना राहण्यासाठी पक्के घरकुल मिळावे, यासाठी शासनाकडून रमाई आणि इंदिरा आवास योजनेतून १ लाख रु पयाचे अनुदान लाभार्थ्यांंंना वाटप करण्यात येतात. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी ५ ते ७ हजार रुपये मोजले त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. खरे लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित राहत आहेत. इंदिरा आणि रमाई आवास योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांंंना नियमांची पूर्त ता करुन घरकुल देण्याची शासनाची योजना आहे. यातून सर्वसामान्य गरीब कुटूंबांना देखील शासनाच्या १ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून हक्काचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. मात्र लोणार पंचाय त समिती अंतर्गत ही योजना फक्त धनदांडग्यांसाठी राबविली जात आहे. गावातील योग्य आणि गरीब कुटूंबाची निवड करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर टाकण्यात आली. मात्र सरपंच, ग्रमासेवक आपल्या अधिकाराचा गैरफायदा उचलून प्रतिक्षा यादीत पैसे मोजणार्यांच्या नावाचा समावेश करुन खर्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली. नियमानुसार पात्र ठरतांना सुद्धा केवळ घरकुलासाठीचे कमिशन न दिल्याने हे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहे. याचा तालुक्यातील गावागावातून सर्वे झाल्यास बरेच वास्तव उघड होईल. तालुक्यात रमाई आणि इंदिरा आवास योजना राबवितांना झालेल्या गैर प्रकाराची सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर करावे. तसेच दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असतांना सुद्धा गटविकास अधिकारी रणदिवे यांच्याकडून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे, हे विशेष.