सिंचन अनुदान योजनेचा सात वर्षातच मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:03 PM2020-12-07T12:03:57+5:302020-12-07T12:05:57+5:30

Irrigation Grant Scheme News लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली आहे.

Benefit of Irrigation Grant Scheme within seven years | सिंचन अनुदान योजनेचा सात वर्षातच मिळणार लाभ

सिंचन अनुदान योजनेचा सात वर्षातच मिळणार लाभ

Next
ठळक मुद्दे ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन अनुदान योजनेचा दुसऱ्यांदा लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली असून, आता ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना २०१४-१५ पर्यंत राबविण्यात येत होती. २०१५-१६ पासून या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतलेल्या क्षेत्रावर १० वर्षांच्या कालावधीनंतरच सूक्ष्म सिंचनासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ पुन्हा घेण्याची संधी होती; परंतु प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेच्या प्रतिथेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ७ वर्षांच्या कालावधीनंतर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. 
त्यामुळे राज्यातही यानुसार निर्णय घेण्याचे कृषी विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले होते. यासंदर्भात ३० ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ३ (भाग ४) मधील अट रद्द करण्यात आली. तसेच एखाद्या क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेऊन ७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच सिंचन क्षेत्रावर अनुदानाचा लाभ देण्यासाठीचा कालावधी ७ वर्षे करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश कृषी विभागाने काढल. 
त्यामुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदींनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सिंचन योजनेचा लाभ घेणे सुकर झाले आहे.  ३० ऑगस्ट २०१९ च्या निर्णयातील अनुक्रमांक ३ भाग (४) मधील तरतूद रद्द केल्याने या योजनेचा ठरवून दिलेल्या कालावधीत लाभ घेता येईल.

Web Title: Benefit of Irrigation Grant Scheme within seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.