४० विद्यार्थिनीना दिला सुकन्या समृध्दीचा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:43 PM2020-09-13T12:43:12+5:302020-09-13T12:43:28+5:30
१० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ऐन कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत समाजातील गरीब, वंचित आणि उपेक्षीत विद्याथीर्नींना मदतीचा हात देत एका शालेय विद्याथीर्नीने नवीन पायंडा पाडला. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळत गावातील १० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले. गावातील अनेक विद्याथीर्नीना एकाचवेळी मदतीचा हात मिळाल्याने, अनेकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. खामगाव येथील सई प्रदीप पाटील हीला बालपणापासूनच सामाजिक कायार्ची आवड आहे. आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षीत आणि वंचितांना मदतीचा हात देते. दिवाळीला फटाके न फोडता तसेच वर्षभर खाऊच्या पैशांतून वाचविलेल्या पैशांचा सदुपयोग करण्याचा छंद गत काही वर्षांपासून तिनं जोपासलाय. तिच्या सृजनशील कल्पकतेचा अनेकांना आधार मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल सोबतच सई पाटील हीने नांदुरा तालुक्यातील पिंप्री अढाव येथील ४० पेक्षा जास्त मुलींचे पोस्ट खात्यात सुकन्या ठेव योजनेचे खाते स्वखचार्तून काढून दिले. गत काही वर्षांपासून सई आपल्या खाऊच्या पैशांतून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. दिवाळीला खामगाव येथील गोर गरीब आणि निराधार महिलांना कपड्यांचेही वितरण गत तीन वर्षांपासून करीत आहे.
मान्यवरांच्या हस्ते पासबुकाचे वितरण!
सई पाटील हिने खाऊच्या पैशातून काढलेल्या ४० मुलींच्या सुकन्या ठेव योजनेच्या पासबूकचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निलेश पाटील, शालीग्राम पाटील, मुरलीधर पाटील, भागवत पाटील, तुकाराम खिरोडकार, सौ. कविता प्रदीप पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रृ तरळले.
समाजात जन्माला आल्यानंतर समाजाचे ऋण फेडणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आई-वडिल, आजी आजोबा आणि गुरूजनांनी शिकविलेल्या मदतीच्या संस्कारातून मी लहानशी मदत केली आहे. भविष्यात बाबा आमटेंसारखी समाजाची सेवा करण्याचा माझा संकल्प राहील.
- सई प्रदीप पाटील
विद्याथीर्नी, खामगाव.