४.५ लाख शिधापत्रिकाधारकांना लाभ

By admin | Published: March 17, 2016 02:29 AM2016-03-17T02:29:20+5:302016-03-17T02:29:20+5:30

बुलडाणा केरोसिन सबसिडी बँक खात्यात जमा होणार!

Benefits to 4.5 lakh ration card holders | ४.५ लाख शिधापत्रिकाधारकांना लाभ

४.५ लाख शिधापत्रिकाधारकांना लाभ

Next

बुलडाणा : स्वयंपाक गॅस सबसिडीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आता केरोसिनवर मिळणारी सबसिडीही थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार २४२ बीपीएल, अंत्योदय, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. यामुळे करोसिनच्या काळ्याबाजारावर अंकुश लागणार आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखापेक्षा जास्त आहे. जवळपास २ लाख ६९ हजार ५१0 परिवाराकडे गॅस सिलिंडर आहे; मात्र बरीच कुटुंब आजही पारंपरिक पद्धतीने स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करीत आहे. यामुळे लाकूड आणि करोसिनचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. त्यामुळे अशा लाभार्थ्यांंंना शिधापत्रिकेतून केरोसिनचे वितरण केले जाते. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जवळपास १३३२ किलो लिटर केरोसिन वाटप करण्यात येते. मात्र बर्‍याच लाभार्थ्यांंंना याचा लाभ मिळत नसल्यामुळे त्यांच्या हिस्स्याचे केरोसिन काळ्या बाजारात विकल्या जाते. शिवाय आवश्यकता नसल्यामुळे लाभार्थ्यांंंकडूनही याकडे लक्ष दिले जात नाही किंवा तक्रारही केली जात नाही. शासनाच्या या आदेशानुसार आता प्रत्येक खर्‍या लाभार्थ्यांना केरोसिनचा लाभ मिळणार असून, केरोसिन वितरणातील गैरप्रकार टाळता येणार आहे. शासनाकडून केरोसिनची खरी किंमत ४0 ते ४५ रुपये प्रतिलीटर आहे; मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शिधापत्रिकाधारक व नागरिकांना केरोसिन सध्या १५ ते १७ रुपये प्रतिलीटर या दराने विकण्यात येत आहे. यातील २३ रुपये सबसिडी शासन स्वत: भरुन नागरिकांपर्यंत कमी दरात केरोसिन पोहोचवित आहे. शिधापत्रिकेवर प्रतिव्यक्ती दोन लिटर आणि तीन सदस्यांपेक्षा अधिक व्यक्तीचा परिवारासाठी चार लिटर केरोसिन दिले जाते. त्यामुळे शिधापत्रिकेवर केरोसिन खरेदी झाल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यात २३ रुपये सबसिडी जमा करण्याच्या सूचना अन्न व नागरी विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Benefits to 4.5 lakh ration card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.