बुलडाणा जिल्ह्यातील ७२ हजार शेतऱ्यांना होणार कर्जपूनर्गठनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 02:13 PM2018-11-23T14:13:26+5:302018-11-23T14:13:56+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ७६ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून दुष्काळी स्थिती पाहता दिल्या जाणार्या आठ सवलतींसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात २२ नोव्हेंबरला आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली.

Benefits of debt disbursement of 72 thousand farmers in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यातील ७२ हजार शेतऱ्यांना होणार कर्जपूनर्गठनाचा लाभ

बुलडाणा जिल्ह्यातील ७२ हजार शेतऱ्यांना होणार कर्जपूनर्गठनाचा लाभ

Next

बुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ७६ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून दुष्काळी स्थिती पाहता दिल्या जाणार्या आठ सवलतींसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात २२ नोव्हेंबरला आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यातील ७२००० शेतकर्यांच्या सुमारे ४०० कोटी रुपायंच्या पीककर्जाच्या पूनर्गठनाचा लाभ मिळण्याची शक्यता जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी व्यक्त केली. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून थकित कर्जाची वसुली थांबविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाध्ये ७४ हजार ६५ शेतकर्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०१८ च्या तारखेपर्यंत वाटप करण्यात आले होते. त्यापैकी दुष्काळ घोषित झालेल्या ७६ मंडळामधील शेतकर्यांच्या पीककर्जाचे पुढील वर्षासाठी पीककर्जाचे पूनर्गठन केल्या जाणार आहे. यासंदर्भात अधिकृतस्तरावर अद्याप परिपत्रक आले नसले तरी २२ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी अनुषंगीक माहिती मागितली आहे. त्यानुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेने आकडेवारीचा काथ्याकुट सुरू केला आहे. त्याचा अंदाज घेतला असता उपरोक्त माहिती समोर आली. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार शेतकर्यांना आतापर्यंत ९५२ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून संपलेल्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ३२ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याचा फायदा ७४ हजार ६५ शेतकर्यांना झाला असून यापैकी दुष्काळी घोषित मंडळातील जवळपास ७२ हजार शेतकर्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी पीककर्ज पूनर्गठनाचा लाभ मिळण्याची शक्यता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उत्तम मनवर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेनेही यंदा ५१ कोटी रुपयांचे पीककर्ज जिल्ह्यातील १२ हजार शेतकर्यांना वाटप केले आहे. ३१ मार्च २०१९ च्या तारखेत ते थकीत राहल्यास या कर्जाचेही पूर्नगठन होऊ शकते, असा अंदाज जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सुत्रांनी व्यक्त केला.

चारा पिकाचेही नियोजन

जिल्ह्यात २४० दिवस पुरेल ऐवढे वैरण उपलब्ध असले तरी आपतकालीन स्थिती पाहता जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांनी साधारणत: आत्मातंर्गत ८५० एक्करवर आणि कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातंर्गत २५० हेक्टरवर चारा पिकाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या आहेत.

 

Web Title: Benefits of debt disbursement of 72 thousand farmers in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.