बेटी बचाओ बेटी पढाओ प्रथम पुरस्कारांसाठी साखरखेर्डाच्या कन्या शाळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:12+5:302021-02-13T04:34:12+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जिल्ह्यातील तीन शाळांची या पुरस्कारासाठी घोषणा केली आहे. एकात्मिक बालविकास सेवा कक्षांतर्गत बेटी बचाओ ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जिल्ह्यातील तीन शाळांची या पुरस्कारासाठी घोषणा केली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा कक्षांतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृतिदल स्थापन करण्यात आले होते. या मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन प्राथमिक शाळांना विशेष अनुदान देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील १३ शाळांचे अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडून मागवण्यात आले होते. यापैकी जिल्हास्तरावरुन तीन शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये या शाळांना पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले. साखरखेर्डा येथील कन्या शाळेचा अव्वल क्रमांक आला असून शाळेचे मुख्याध्यापक कैलास ढोलेकर, भानुदास लव्हाळे, ए. एस. पडघान, सुरेंद्र जैन, एच एम खान, यांचे पालकांनी कौतुक केले आहे. आय एस ओ दर्जा मिळवण्यासाठी शाळा १०० टक्के डिजिटल करण्यासाठी ज्ञानरचनावादावर विविध उपक्रमाद्वारे बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमासाठी विषय साधन व्यक्ती पदमाकर गवई यांचे मार्गदर्शन लाभले.