सावधान...डेंग्यू, चिकन गुनिया कधीही काढू शकतो डोके वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:03+5:302021-09-17T04:41:03+5:30
जिल्ह्यात पावसाळी वातावरणात ताप, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्यासह इतर आजारांची लागण होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. असे जरी असले ...
जिल्ह्यात पावसाळी वातावरणात ताप, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्यासह इतर आजारांची लागण होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. असे जरी असले तरी डेंग्यूचे सात सक्रिय रुग्ण असून, मलेरियाचे तीन रुग्ण आहेत. ही संख्या कमी जरी वाटत असली तरी कधीही वाढू शकते याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
काय आहेत लक्षणे?
डेंग्यू :
एकदम जोराचा ताप चढणे
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
स्नायू आणि सांध्यांमधे वेदना
चव आणि भूक नष्ट होणे
छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
मळमळणे आणि उलट्या
काविळ :
त्वचा, नखे, डोळ्यांचा पांढरा असलेला भाग पिवळसर दिसायला लागतो.
पोट दुखणे, भूक न लागणे, अपचन होणे.
वजन कमी होणे, थकवा येणे
मूत्राचा रंग पिवळा होणे
ताप येणे
हातांवर खाज येणे
चिकन गुनिया : चिकन गुनियाचे सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात कारण त्याच्या सोबत तीव्र सांध्यांच्या वेदना असतात. या व्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा देखील सामान्य लक्षणे आहेत.
व्हायरल फिव्हरचे रोज किमान ३० ते ४० रुग्ण
डेंग्यू आणि चिकन गुनियाचे जिल्ह्यात प्रमाण जरी कमी असले तरी सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण वाढते आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या दिवसाला किमान ३० ते ४० व्हायर फिव्हरचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती आहे.
डेंग्यूचे सात रुग्ण
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर येथे आढळलेल्या सात डेंग्यू रुग्णांमध्ये लहान बालकांचा समावेश आहे. ही बालके ७ ते १३ वर्ष वयोगटातील असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तेव्हा लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
डेंग्यू चिकन गुनिया हिवताप
७ ०० ३