फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:00+5:302021-05-19T04:36:00+5:30

परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर... १. फेसबुकवर ज्याच्या प्रोफाइल लॉक नाहीत अशा खातेधारकांचा फोटो घेऊन बनावट खात्याला जोडला जातो. आणि ...

Beware if money is demanded from Facebook! | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!

Next

परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर...

१. फेसबुकवर ज्याच्या प्रोफाइल लॉक नाहीत अशा खातेधारकांचा फोटो घेऊन बनावट खात्याला जोडला जातो. आणि संबंधित व्यक्तीच्या यादीतील मित्रांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. अनेकजण ती स्वीकारताच पैशाची मागणी करणारे संदेश प्राप्त होत आहेत. यामध्ये दवाखान्याचे तात्काळ काम आहे, उद्या सकाळीच पैसे परत करतो, खूप गरज आहे लवकर पैसे पाठवा, असे संदेश पाठविले जात आहे. ज्यांना या प्रकाराविषयी माहिती नाही ते याला बळी ठरत आहे.

२. जिल्हा पोलीस दलाकडे वर्षाला ऑनलाइन फसवणुकीचे ३० ते ३५ गुन्हे दाखल होता. यामध्ये फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक झालेले काही गुन्हे दाखल आहेत. याबाबत तपास केला जात आहे. मात्र, प्रत्येकाने स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

३. बहुतांश वेळा ओळखीच्या व्यक्तीने फेसबुक संदेशाद्वारे पैसे मागितल्यावर काहीजण तात्काळ पैसे पाठवितात. मात्र, त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अनेकदा फेसबुक खाते हॅक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

..अशी घ्या काळजी

फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी झाल्यास तात्काळ संबंधित मित्रास याची कल्पना द्यावी, त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी. प्रकरण गंभीर असल्यास फेसबुक हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाने आपली माहिती अनोळखी व्यक्तीला फोनद्वारे देणे टाळावे. कोणत्याही प्रकारची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

आमिषाला बळी पडू नका...

सध्या ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. दुप्पट पैसे करून देतो, अर्जंट दवाखान्याचे काम आहे बँक खात्यावर पैसे पाठवा, तुम्हाला आवश्‍यक असलेली औषधी तात्काळ पुरवठा करतो, या नंबरवर पैसे पाठवा अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये. प्रत्येकाने ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Beware if money is demanded from Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.