मेहकर येथे भारत बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:16+5:302021-03-27T04:36:16+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार व बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार व बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत मेहकर विधानसभा मतदारसंघ व मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकर वाटिका समोरून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा देऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य रोडवरील सर्व दुकानदारांना या बंदला पाठिंबा देण्यासाठी आव्हान करून स्थानिक उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने, सुदेश लोढे, भूषण देशमुख, सुरेश मुंदडा, ॲड. जगन्नाथ निकस, वसंतराव देशमुख, कलीम खान, डी. जी. गायकवाड, बाळासाहेब सावजी, स्वाती पऱ्हाड, आरती दीक्षित, वसीम कुरेशी, रवी सावजी, नितीन तुपे, संजय म्हस्के, नारायण पचेरवाल, शैलेश बावस्कर, मुन्ना काळे, युनूस पटेल, वैभव उमाळकर, अक्षय इनकर, ॲड. गोपाल पाखरे, धर्मा बनचरे, संजय वानखेडे, किशोर गवई, मुनाफ खान, छोटू गवळी, नारायण इंगळे, सुखदेव ढाकरके, सुनील अंभोरे, रियाज कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे भास्करराव काळे, गिरधर ठाकरे, शैलेश सावजी, पाटील, गजानन सावंत, कैलास जाधव, दत्ता घनवट, राजाभाऊ रहाटे, संदीप पांडव, निसार अन्सारी, भरत लांडकर, रहिम गवळी, कैलास सावंत, लक्ष्मण मंजुळकर, शुभम रांधवण, सद्दाम कुरेशी, गजानन काळे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.