भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, ट्रकचालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 22:08 IST2022-01-02T22:07:23+5:302022-01-02T22:08:27+5:30
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. मो. रिजवान शेख, रुग्णवाहिका चालक गणेश वनारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, ट्रकचालकास अटक
बुलढाणा - नांदुरा ते खामगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गा क्रमांक 6 वर आमसरी फाट्यासमोर भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना २ जानेवारी च्या संध्याकाळी ५.३०वाजता घडली. बेलाड ता. मलकापूर येथील राजेश बळीराम इंगळे (वय अंदाजे ३५वर्षे) हे आपल्या दुचाकी क्रं एम. एच. २८ ए.ई ४७८४ ने नांदुऱ्याकडे येत असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले.
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. मो. रिजवान शेख, रुग्णवाहिका चालक गणेश वनारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉ बेंदे यांनी तपासणी करुन अपघाती युवकास मृत घोषित केले याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळत असून जलंब पोलीसांची पुढील कायदेशीर कारवाई सुरु होती.