भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 01:07 PM2020-04-15T13:07:57+5:302020-04-15T13:13:12+5:30

कोरोनामूळे साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

Bhendvad ghat canceled; 350 year old tradition broken | भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

googlenewsNext

- जयदेव वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: दिवसेंदिवस महाराष्ट्रभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे परंपरेनुसार २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घट मांडणी रद्द करण्यात आल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ‘लोकमत’ला आज दिली. बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवड येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. कुठल्याही दृकश्राव्य साधनांचा शोध त्यावेळी नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवड ला यायचे. या मांडणीचे भाकीत ऐकायचे. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करायचे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. या घटमांडणी वर महाराष्ट्रातील शेतकºयांची भिस्त असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून सुरू असणारी ही परंपरा आजही त्याच विश्वासाने जपल्या गेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, करंजी ,भजा ,वडा इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या गटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसºया दिवशी सकाळी सुर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेती विषयक, राजकारण , नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील याबाबत जे अंदाज वर्तविले जातात. तर पृथ्वीवर येणाºया संकटाची याविषयी वाणीतून व्यक्त केली जाते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवित आहेत परंतु यावर्षी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे . महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ जाहीर करण्यात आले आहेत . तर जमावबंदी ला मनाई आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमा होऊ नये. यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ मांडणी रद्दचा निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी भेंडवडला येवू नये

भेंडवडची मांडणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ एप्रिलरोजी घट मांडणी केली जाणार नाही. आणि २७ एप्रिल रोजी पहाटे त्याचे भाकीत सुद्धा करण्यात येणार नाही. त्यामुळे परिसरातील कोणत्याही शेतकºयांनी अथवा नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये. आपल्या घरातच राहून सुरक्षित राहावे. कोरोना सारख्या महामारी ला घरात बसूनच तोंड द्यावे. आणि शासनाला सहकार्य करण्याचे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Bhendvad ghat canceled; 350 year old tradition broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.