५ काेटी ५० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:53+5:302021-06-22T04:23:53+5:30
वाघजाळ फाटा-धामणगाव बढे-फत्तेपूर-जामनेर ४४ किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याच्या कामाची सुधारणा करणे व दाताळा-पाडळी-गिरडा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संजय गायकवाड यांच्या ...
वाघजाळ फाटा-धामणगाव बढे-फत्तेपूर-जामनेर ४४ किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याच्या कामाची सुधारणा करणे व दाताळा-पाडळी-गिरडा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संजय गायकवाड यांच्या हस्ते २१ जून राेजी टाकळी व गोतमारा येथे पार पडला. मागील एका वर्षापासून कोरोनामुळे अनेक कामे ठप्प झालेली असली तरी आमदार गायकवाड यांनी आपल्या कामाचा सपाटा मात्र कायम ठेवला आहे. गावांमधील स्मशानभूमी, भव्य दिव्य व्यायाम शाळेची कामे, नवीन रस्त्याची कामे, महामानव, थोर पुरुषांचे पुतळे, शेत रस्त्याचे कामे या सर्व प्रकारची कामे करण्याचा सपाटा आमदार गायकवाड यांनी सुरू केला आहे. भविष्यामध्ये आपण विविध विकास योजनांच्या माध्यमातून निधी खेचून आणून या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. वाघजाळ फाटा-जामनेर हा रस्ता जळगाव मतदारसंघ, बुलडाणा विधानसभा मतदारसंघ, खान्देश विभागाशी संपर्क साधण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याच्या सुधारणांमुळे या भागामध्ये वाहतूक करण्यास अधिक सुलभ होईल व दाताळा-पाडळी-गिरडा हा रस्ता विदर्भ व मराठवाडा विभागासाठी फार महत्त्वाचा आहे. भूमिपूजन समारंभ टाकळी येथील लक्ष्मी पारसकर यांच्या हस्ते करण्यात आला. (वा़ प्र.)