दाताळा ते पाडळी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:49+5:302021-06-03T04:24:49+5:30

मागील एका वर्षापासून कोरोनामुळे अनेक कामे ठप्प झालेली असली तरी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कामाचा सपाटा ...

Bhumipujan of Datala to Padli road work | दाताळा ते पाडळी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

दाताळा ते पाडळी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Next

मागील एका वर्षापासून कोरोनामुळे अनेक कामे ठप्प झालेली असली तरी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कामाचा सपाटा मात्र कायम ठेवला आहे. गावांमधील स्मशानभूमी असो, व्यायामशाळेची कामे असो, नवीन रस्त्याची कामे असो वा रस्ता दुरुस्तीची कामे असो किंवा नगरपंचायत क्षेत्रांमधील कामे असो या सर्व ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी कामाचा सपाटाच सुरू केल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. १ जून राेजी ५ कोटी ५० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय गायकवाड यांनी करून आपण या मतदारसंघाचा कायापालट करण्यास कटिबद्ध असल्याचे सूचित केले. दाताळा ते पाडळी हा रस्ता मलकापूर मतदार संघ, बुलडाणा विधानसभा मतदारसंघ व मराठवाडा विभागाशी संपर्क साधण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. (वा. प्र.)

Web Title: Bhumipujan of Datala to Padli road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.