सागवन, नांद्राकोळीमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:32+5:302021-06-29T04:23:32+5:30

सागवन व नांद्राकोळी ही दोन मुख्य गावे बुलडाण्याला जोडलेली आहेत. दररोज या गावांतून बुलडाण्यात शेकडो नागरिक विविध कामांसाठी ये-जा ...

Bhumipujan of development works in Teak, Nandrakoli | सागवन, नांद्राकोळीमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

सागवन, नांद्राकोळीमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

Next

सागवन व नांद्राकोळी ही दोन मुख्य गावे बुलडाण्याला जोडलेली आहेत. दररोज या गावांतून बुलडाण्यात शेकडो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करीत असतात. या गावांतील नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावे यासाठी आमदार संजय गायकवाड प्रयत्‍नशील आहेत. या गावांतील रस्त्‍यासाठी वार्षिक बजेटमधून सुमारे अडीच कोटी रुपयांची तरतूद त्‍यांनी करून दिली असून, या रकमेतून या परिसरात चांगला व दर्जेदार रस्ता गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यावेळी या दोन्ही गाव परिसरातील नागरिकांना आपण विकासासाठी सदैव त्‍यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड़, शिवसेना तालुका अध्यक्ष लखन गाडेकर, उपजिल्हा प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख नीलेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच आरती वानेरे, सरपंच आशा काळवाघे, माजी सरपंच ओमसिंग राजपूत, उपसरपंच देवानंद दांडगे, उपसरपंच मनोज जाधव, अंकुश भाकरे, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर काळवाघे, विजय काळवाघे, पंकज काळवाघे, बालू राऊत, राहुल गंगवाळ, रमेश काळवाघे, संजय गवळी, गजानन घुबे, विनोद जाधव, मोहन जाधव, पप्पू शाळ, संपत हिवाळे, संदीप हिवाळे, निबाजी झिने, गोपाल भाग्यवंत, देवानंद दांडगे, अशोक उगले, सुरेश सोनवणे, सचिन सोनवणे, किशोर आहेर, साहेबराव इंगळे, उमेश पुरभे, बंडू चव्हाण, सुभाष मिसाळ, गजानन पाटील व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of development works in Teak, Nandrakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.