आक्रोश मोर्चा जनजागृतीसाठी मोताळ्य़ात दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:36 PM2017-10-22T23:36:44+5:302017-10-22T23:38:04+5:30
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, व्या पारी, शेतमजूर, अतिक्रमणधारक व सर्वसामान्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ ऑक्टोबरला बुलडाण्यात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोताळ्य़ात २२ ऑक्टोबरला मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, व्या पारी, शेतमजूर, अतिक्रमणधारक व सर्वसामान्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ ऑक्टोबरला बुलडाण्यात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोताळ्य़ात २२ ऑक्टोबरला मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
राजे मित्र मंडळातर्फे सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या या रॅलीला मोताळा फाटा येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीस सुरुवात झाली.
मोताळा शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करीत मोताळा फाटा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्ते व नागरिकांना आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार विजयराज शिंदे, शिव वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय हाडे, शेतकरी नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरदचंद्र पाटील, सागवनचे सरपंच ओमसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीमध्ये नगरसेवक प्रवीण पाटील यानी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम लखोटिया, साहेबराव डोंगरे, दिवाकर हुंबड, अनंता दिवाने, प्रवीण पाटील, विशाल सपकाळ, गजानन खिरोडकर, दीपक शेळके, राजू पाटील, प्रभाकर पाटील, गुलाब शिराळ, श्रीकृष्ण सुरडकर, उपसभापती तेजराव पाटील, गजानन कोहाडे, पुंजाजी तायडे, सचिन घडेकर, प्रदीप जैन, गणेश सा तव, कीटू किनगे, अनिल खिरोचे यांच्यासह शेकडो शिवसेना कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी, शेतमजूर, व्यापार्यांच्या समस्या शासन दरबारी निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. त्यात मोठय़ा संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे.
- विजयराज शिंदे, माजी आमदार, बुलडाणा