अकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या दुचाकी होणार जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 04:58 PM2020-04-21T16:58:16+5:302020-04-21T16:58:24+5:30
पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत या बहुतांश दुचाकी पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे.
बुलडाणा: राज्यात कोरोना ससंर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढत असतानाच बुलडाणा जिल्ह्यात अकारण दुचाकीवर बाहेर फिरणाऱ्यांवरही आता गंडांतर आले आहे. अशा व्यक्तींच्या दुचाकीच थेट जप्त करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
बुलडाण्यात १९ एप्रिल रोजी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनुषंगीक आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना दिले आहेत. दरम्यान, संपलेल्या आठवड्यापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात दुचाकीवर अकारण फिरणाºया तब्बल पाच हजार १९४ व्यक्तीवर पोलिस विभागाने कारवाई करून त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. परिणामी आता जोपर्यंत पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत या बहुतांश दुचाकी पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे.
त्यामुळे आगामी काळातही अकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाºया व्यक्तींच्याही दुचाकी जप्त करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला आहे. थेट गृहमंत्र्यांनीच याबाबत मोकळी दिल्याने पोलिसांचेही मनोबल आता वाढले आहे.
असे असले तरी संचारबंदीच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात विविध स्वरुपाचे जवळपास ७२८ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये जवळपास ९४३ व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोशल मिडीयावरही अफवा पसरविणाºया नऊ जणांविरोधात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलचीही त्यामुळे जिल्ह्यात समाजमाध्यमावर नेमका काय ट्रेन्ड सुरू आहे, अफवा पसरविणाºया पोस्टसह अशा व्यक्तींचेही ट्रॅकींग पोलिस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोशल मिडीयावर पसरणाºया अफवांवर लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा एक विभागच सक्रीय झाला आहे. सायबर क्राईमचे आयजी मिलींद भारंबे प्रामुख्याने या संपूर्ण बाबी हाताळत असून राज्यात आतापर्यंत २४१ व्यक्तींवर अनुषंगीक विषयान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.