वैद्यकीय साहित्य रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:22 PM2019-06-07T17:22:05+5:302019-06-07T17:22:18+5:30

वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नसून ते रस्त्यावर कुठेही फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते. 

Bio Medical waste throw On the Road | वैद्यकीय साहित्य रस्त्यावर

वैद्यकीय साहित्य रस्त्यावर

Next

रुईखेड मायंबा: परिसरात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. अनेक दिवसांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नसून ते रस्त्यावर कुठेही फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते. 
बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय जोरात सुरू केला आहे. ज्यांच्याकडे कुठलीच डिग्री नसणारेही रुग्णांवर उपचार करताना दिसून येत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाºया इंजेक्शन, सलाईन, यासारख्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांना अभय मिळत आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे आजरांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांची चांदी होत आहे. याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. 
 
बोगस डॉक्टरांच्या संदर्भात माहिती मागविली आहे. त्यांची वैद्यकिय सेवे संदर्भात पदवी आणि तत्सम पात्रतेची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. प्रशांत बडे, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, बुलडाणा. 

Web Title: Bio Medical waste throw On the Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.