पिंपळगाव कुंडा येथे साकारणार जैविक इंधन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:43+5:302021-07-05T04:21:43+5:30
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव कुंडा येथे नेपियर (हत्ती गवत) गवतापासून जैविक इंधन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ...
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव कुंडा येथे नेपियर (हत्ती गवत) गवतापासून जैविक इंधन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या जैविक इंधन प्रकल्पासाठी लागणारे हत्ती गवताच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. पाच हजार शेतकरी सभासद करण्याचा उद्देश या कंपनीचा असल्याने शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. नेपियर गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाचा शोध लागला आहे. देशभरात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गॅस व सेंद्रिय खत प्रकल्प उभारले जात असून, ते यशस्वीपणे चालविले जात आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होत आहे. त्यामुळे, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सिंदखेडराजा येथील भूमिपुत्र डॉ. अर्चना झोरे यांनी हा प्रकल्प उभारणीला प्रारंभ केला आहे. सीएनजी, पीएनजी, सीओ २ खतांची निर्मिती या प्रकल्पात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नेपियर गवताची लागवड करण्यासाठी बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. ३० जूनला साखरखेर्डा येथे माजी सरपंच कमलाकर गवई, ललित अग्रवाल, शिंदीचे माजी सरपंच अशोक खरात, कृषी सहाय्यक समाधान वाघ, दत्ता राऊत, भगवान देवकर, प्रताप भोसले या शेतकऱ्यांच्या उपस्थित अमोल गवई यांना प्रकल्पाच्या संचालक डॉ. अर्चना झोरे यांनी बियाणाचे वाटप केले. तत्पूर्वी सिंदखेडराजा येथे नगराध्यक्ष सतीश तायडे, गजानन झोरे, शिवा ठाकरे, शिवाजीराजे जाधव, सीताराम चौधरी यांच्या उपस्थितीत बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. गोदावरी ठाकरे, पिंपळगाव लेंडी येथे सुनील गायके, किनगावराजा येथील विष्णू फुलझाडे, किशोर फुलझाडे, पिंपळगाव कुडा येथील गजानन तांबे, बाळसमुद्र येथील अरुण मेरत यांनाही माेफत बियाणे देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार लाभ
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात लाभ हाेणार आहे. शेतकऱ्यांना नेपियर गवताची लागवड करण्यासाठी बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. पाच हजार शेतकरी सभासद करण्याचा उद्देश या कंपनीचा असल्याने शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.