खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:26 PM2020-11-17T12:26:15+5:302020-11-17T12:26:30+5:30
खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव निसर्ग तथा जैवविविधतेचा उदात्त हेतू समोर ठेवून संपूर्ण आठवडाभर अनेक पक्षीमित्र, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. खामगावात घरटे लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
याच अनुषंगाने येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी या दरम्यान पक्षी छायाचित्र प्रदर्शन, मार्गदर्शन कार्यशाळा, ईको फ्रेण्डली घरटे निर्मिती, पक्षी पाणवठे, चिमणी घरटे वितरण, वर्तमानपत्राचे कात्रणे प्रदर्शनी अशी विविध प्रकारची उपक्रम राबवित पोपट, पिंगळा (घूबळ), ब्राह्मणी मैना या पक्ष्यांची घरटे घाटपूरी परिसरातील वृक्षांवर लावून पक्षी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. परिसरातील वड पिंपळ, बाभूळ अश्या मोठ्या झाडांची कत्तल केल्यामुळे पोपट, पिंगळा,घार,ससाना या पाखरांचा अधिवास नष्ट झाल्याने ही पाखरे परिसरात आढळून येत नाही. ह्या पक्ष्यांचा आढळ जर आपल्या परिसरात असला तर किडे-किटक,साप,गोम,उंदीर यांचे संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे पक्षी करीत असतात. कलाध्यापक संजय गुरव यांनी आपल्या घरी सन २००९ मध्ये पिंगळा (घूबळ) पक्षी करीता लाकडी घरटे तयार करून लावले. त्या घरट्यात पिंगळा पक्षी वास्तव्यास आला. या पक्षी सप्ताहात घरट्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी सप्ताहाचा समारोप अशी घरटे लावूनच साजरा केला.
खामगाव आणि परिसरात हजारो घरटी लावण्यात आली. गत अनेक वर्षांपासून पक्षांची पर्यावरण पूरक घरटी लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहेे.
त्यासाठी साहित्यिक किशोर भागवत, प्रकाश अहीरे, जाधव, सुरेश भोपळे, भगत,अनिकेत मु-हेकर,तेजस भुमरे,खुश गोयल,दिशा गोयल संदेश गुरव ओम राहटोळे यांनी परिश्रम घेतले.