खामगावात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:53 PM2018-04-11T14:53:29+5:302018-04-11T14:54:51+5:30

खामगाव : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य खामगांव मतदार संघाचे  आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. 

birth anniversary of Jyotiba Phule in Khamgawa | खामगावात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

खामगावात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next
ठळक मुद्दे शहरात मिरवणूक काढण्यात आली, ठीकठिकाणी या  मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. “जय ज्योती” “जय क्रांती” च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.

खामगाव : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य खामगांव मतदार संघाचे  आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. 

खामगांव शहरात व मतदार संघात देखील महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ठीक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्यात आली आहे.  शहरात मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी ठीक ठिकाणी या  मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले. दरम्यान आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी देखील सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी “जय ज्योती” “जय क्रांती” च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.  यावेळी पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी, भाजपा तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, राजेंद्र धनोकार, रामेश्वर बंड पंचायत समिती सदस्य, कैलास बगाडे, रवींद्र बोचरे, विजय वावगे, गजानन गायकी, प्रदीप सातव, योगेश हजारे, अशोक भोपळे, संतोष बगाडे, रवी क्षीरसागर, दत्ता जवळकार,डॉ.वानखडे, डॉ.निलेश टापरे यांचे सह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: birth anniversary of Jyotiba Phule in Khamgawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.