भाजपाने विदर्भातील जनतेला फसविले - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:31 AM2017-11-23T00:31:45+5:302017-11-23T00:35:57+5:30

भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. 

BJP deceived the people of Vidarbha - Vamanrao Chatap | भाजपाने विदर्भातील जनतेला फसविले - वामनराव चटप

भाजपाने विदर्भातील जनतेला फसविले - वामनराव चटप

googlenewsNext
ठळक मुद्दे११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. 
स्थानिक पत्रकार भवन येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अँड.सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा, तेजराव मुंडे,  रंजना मामर्डे, समाधान कणखर आदी उपस्थित होते. चटप पुढे म्हणाले, की स्वतंत्र विदर्भ  राज्य देऊ, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जातून मुक्त करू, शेतीमालास उत्पादन खर्च अधिक  पन्नास टक्के नफा एवढे हमीभाव देऊ, शेतकर्‍यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून त्यांना मरू  देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त करू, विजेचे बिल कमी करून लोडशेडिंग संपवू, अशी  अनेक आश्‍वासने भाजपाच्या नेत्यांनी भाषणामधून व जाहीरनाम्यातून विदर्भाच्या जनतेला  निवडणुकीच्या वेळी दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्‍वासन वैदर्भीय जनतेचे व शे तकर्‍यांचे भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पूर्ण केले नाही. उलट विदर्भ राज्य देण्याच्या  तसेच शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याच्या आश्‍वासनापासून ते पळ काढत आहे. तीन वर्षांत  आश्‍वासन पूर्ण न करताच नव्याने २0१९ मध्ये येणार्‍या निवडणुकीची जोरदार तयारी भाज पाचे नेते करीत आहेत.
भाजपा पक्षाला जनतेला दिलेल्या आश्‍वासनापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे म्हणून ते पुन्हा  निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. दिलेले आश्‍वासन ‘चुनावी जुमला’ होता  किंवा विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून अमित शहांचे वक्तव्य तर विदर्भ प्र थम सक्षम करू,  नितीन गडकरींचे वक्तव्य म्हणजे विदर्भातील जनतेचे, शेतकर्‍यांचे  बेरोजगारांचे, भाजपा नेत्यांनी फसवणूक केली आहे. 
त्यामुळे आता आरपारच्या लढाईची सुरुवात करून ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे  हिवाळी अधिवेशन नागपूरला भरत आहे. त्यावर बहिष्कार घालून पहिल्याच दिवशी ११  डिसेंबर रोजी संपूर्ण विदर्भात बंद पाळण्यात येणार आहे. व्यापार्‍यांनी व्यापार बंद करून शे तकर्‍यांनी शेतीची कामे बंद करून, संप करून, बेरोजगारांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी  शाळा, कॉलेजमध्ये संप पाळून, ११ डिसेंबरच्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन  विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात येत आहे.
११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची तयारी जोरात सुरू झाली आहे. विदर्भातील अकराही  जिल्ह्यांतील जिल्हा बैठका झाल्या असून, संपूर्ण विदर्भातील तालुकास्तरीय बैठका सुरू  आहेत. सर्व विदर्भवादी संघटनांना, सर्व व्यापारी संघटनांना, शाळा, कॉलेज, इतर प्र ितष्ठानांना भेटून या बंद आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. विदर्भ  माझा, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ गण परिषद, जनसुराज्य पार्टी आदी विदर्भवादी  संघटनांनी ११ डिसेंबर रोजी या विदर्भ बंदच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.  मागील वर्षी मुंबईत भरलेल्या अधिवेशन काळात एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस,  राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन त्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव आणून विदर्भ राज्याला  विरोध केला होता. त्याच धर्तीवर विदर्भातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर सर्व  पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र विदर्भ राज्याचे सर्मथन करावे व या  आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात येत असल्याचे चटप  यांनी यावेळी सांगितले. 
-

Web Title: BJP deceived the people of Vidarbha - Vamanrao Chatap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.