भाजपाच्यावतीने मिसाबंधूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:23+5:302021-06-28T04:23:23+5:30
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला ४६ वर्ष पूर्ण झाली. ...
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला ४६ वर्ष पूर्ण झाली. या आणीबाणीचा आणि लोकशाही विरोधी भूमिकेचा विरोध करणाऱ्या अनेक सत्याग्रहींना त्यावेळच्या सरकारने बेकायदेशीरपणे अटक केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्कालीन भारतीय जनसंघाचे चिखली तालुक्यातील ३६ कार्यकर्त्यांनी १९ महिने नाशिक आणि ठाणे येथील कारागृहात बंदिवास भोगला होता. त्यांच्यापैकी चिखली शहरातील भाऊसाहेब लाहोटी, राजाभाऊ खरात, छबू शेटे, नागोराव गवळी (अमडापूर) व डॉ. मारोतीराव दिघे (ईसोली) हे पाच हयात आहेत. त्यांचा यथोचित सत्कार श्रीराम नागरी बँकेच्या सभागृहात तर ग्रामीण भागातील मिसाबंधूंचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लाहोटी व खरात यांनी आणीबाणीच्या दिवसांतील संघर्षपूर्ण आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. विजय कोठारी, चिखली अर्बन अध्यक्ष सतीश गुप्त, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, संजय चेके पाटील, रामदास देव्हडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, पंजाबराव धनवे, संतोष काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेंद्र पांडे, आभार सुहास शेटे यांनी मानले.