भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 06:45 PM2018-05-25T18:45:10+5:302018-05-25T18:45:10+5:30

यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.

BJP government anti-farmer -bacchu Kadu | भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

Next
ठळक मुद्देप्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते.

 बुलडाणा : भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत विधान करून अवमान करीत आहेत. यावरून भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. मात्र यापुढे शेतकऱ्यांचा अवमान सहन करून घेणार नाही. प्रहारची आसूड यात्रा ही शेतकरी कट्टरवादाच्या धोरणाची सुरवात आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर, दिव्यांग निराधार बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. कडू यांनी भाजपाच्या धोरणावर सडकून टीका केली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष शेतकºयांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तूर सोयाबीन हरबरा आदी पिकांना बाजाराभाव मिळत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून शेतकºयांच्या घरात तूर पडून आहे. बोंडअळीची नुकसानभरपाई अद्याप मिळलेली नाही. पीककर्जासाठी बँक शेतकºयांना उभे करत नाही. अशा अवस्थेत पेरण्या कशा कराव्यात असा प्रश्न शेतकºयांसमोर असताना सरकार मात्र फक्त घोषणा करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्या सोडविल्या नाही तर यंदा हंगामाची पेरणी करण्याऐवजी आम्ही भाजपाचीच पेरणी करणार आणि शेतात पीक लावण्याऐवजी भाजपचे झेंडे लावणार असल्याचेही आ. कडू यांनी यावेळी सांगितले. विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलताना आ.कढू म्हणले की, आज राज्याचे सर्व महत्वाचे मंत्रीपदे विदर्भाच्या नेत्यांच्या हातात आहेत. तरीसुद्धा विदर्भाच्या आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, रोजगार आदी मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भाला २३ टक्के वाटा देण्यात आला, मात्र त्याची २ टक्केही पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे शेतकºयासाठी कट्टरवादाचे धोरण अमलात आणण्यात येणार असून जो बळीराजाचा अवमान करेल त्याला प्रतिउत्तर देण्यात येईल, असा इशाराही आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या आसडू यात्रेत सर्व राज्यातून प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भाजपा नेत्यांना स्मरणशक्तीची कॅप्सुल देणार

शेतकरी संकटात असताना भाजपा सरकार साखर, हरबरा, वटाणा आयात करीत आहे. त्यांचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय महागाई वाढत असून पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली, मात्र आज त्यांना आपल्याच विधानांचा विसर पडला आहे, त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना समरणशक्तीची कॅप्सूल देणार असल्याचा उपरोधिक टोलाही आ. बच्चू कडू यांनी यावेळी मारला.

Web Title: BJP government anti-farmer -bacchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.