भाजप सरकारचे फसवे धोरण युवक काँग्रेस उलथून टाकणार - प्रतिभा रघूवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:29 PM2017-08-04T19:29:26+5:302017-08-04T19:33:30+5:30
बुलडाणा : लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान खोट्या आश्वासनाची खैरात करुन मोठ्या प्रमाणात जाहीराती करुन अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवले आणि भाजप सरकार देशात व राज्यात सत्तेत आली मात्र येणाºया काळात भाजप सरकारने जे फसवे ध्येय धोरण राबवून नागरिकांची दिशाभूल करणे सुरु केले ते फसवे धोरण येणाºया काळात युवक काँग्रेसने उलथून टाकण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन युवक काँग्रेसच्या राष्टÑीय महासचिव प्रतिभा रघूवंशी यांनी बुलडाणा येथे आयोजित युवक काँग्रेसच्या विस्तारीत बैठकीत बोलतांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी युवक काँग्रेसचे राष्टÑीय सचिव अमित यादव, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे प्रभारी डॉ.झिशान हुसेन, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे, माजी युवक अध्यक्ष धनंजय देशमुख, उपअध्यक्ष इरफान पठाण, राम डहाके, गजमफर, गजानन काकड, विजयसिंग राजपूत, रमेश सुरडकर, तुषार भावसार, गणेश सरोदे, योगेश परसे, दिलीप बोरे, रवि मिस्किन, संजय सोळकर, शैलेश खेडकर, सचिन मुंढे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी अमित यादव म्हणाले की, येणारी निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पक्षबांधणी ही बुथ बांधणीपासून सुरु करुन प्रत्येक मतदारापर्यंत काँग्रेस पक्षाची विचारसरणी पोहचवा नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळेल. तसेच या समोर बोलतांनी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणने मांडत युवक काँग्रेसचे महासचिव प्रतिभा रघुवंशी व यादव यांच्या माध्यमातून राष्टÑीय नेतृत्वापर्यंत पोहचावे असे आवाहन केले. आयोजित विस्तारीत कार्यकारिणी बैठकीचे सुत्रसंचलन हे इरफान पठाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन, विजयसिंग राजपूत यांनी केले.