भाजपचा उमेदवार नाही

By admin | Published: July 11, 2014 11:54 PM2014-07-11T23:54:48+5:302014-07-12T00:15:06+5:30

खामगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक

BJP is not a candidate | भाजपचा उमेदवार नाही

भाजपचा उमेदवार नाही

Next

खामगाव : शहर विकास आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले पडली असून, नगरसेवक वैभव डवरे यांनी शहर विकास आघाडीच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक नगरसेवक काँग्रेस आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता बळावली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, शविआ या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असतानाच ११ सदस्य असलेल्या भाजपने आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे भाजपच्या निवडणुकीतील भूमिकेकडे सांशकतेने पाहिल्या जात आहे.
खामगाव नगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता या मथळ्याखाली लोकमतने १0 जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानुसारच आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घडामोडी घडल्या. पराजयाची भीती असल्यामुळे ११ सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात दिला नसून, भारिपही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. याउलट शिवसेनेच्या एका नगरसेवकाने नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केल्यामुळे राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिप जारी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नीता बोबडे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहीले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता बोबडे यांनी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठीच अर्ज दाखल केल्याची चर्चा नगरपालिका वतरुळात आज होती. पक्षाचा व्हीप त्या नाकारणार नसल्याचा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला.
थोडक्यात शहर विकास आघाडीत त्यांची भूमिका ह्यतळ्यात-मळ्यातह्ण अशीच मानल्या जात आहे. आघाडीच्या व्हिपमुळे आ. सानंदा यांच्या सत्तेचा वारू रोखण्यात भाजपला सपशेल अपयश आल्याचे चित्र आज पालिकेत पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद दे त, वरिष्ठांच्या आदेशानेच आपण आघाडीत सहभागी झाल्याचे नगरसेवक वैभव डवरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे माजी नगराध्यक्ष गणेश माने राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे चित्र असून आता निवडणुकीच्या अंतिम दिवसांची सर्वांना प्रतीक्षा आहे.

Web Title: BJP is not a candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.