मेहकरात वीज दरवाढीविरुद्ध भाजपचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:05+5:302021-02-07T04:32:05+5:30
महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारच्या महावितरणमध्ये अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारद्वारे वीज देयके कमी करण्यात येतील ...
महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारच्या महावितरणमध्ये अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारद्वारे वीज देयके कमी करण्यात येतील व १०० युनिट वापरापर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात येतील, अशी घोषणा सरकारद्वारे करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत वीज देयके माफ करण्यात आली नाहीत. उलट अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आली असून त्याची तुघलकी वसुली करण्यात येत आहे. उलट दिलेली वीज देयके भरावीच लागतील, असे ऊर्जामंत्री यांनी जाहीर केले. संपूर्ण महाराष्ट्रातील ७८ लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सरकारद्वारे सुरू आहे. याविरोधात ‘टाळाबंद’ व ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. मेहकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपविभागीय महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याआधीच पोलीस प्रशासनाने रोखले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना घेराव घातला व सरकारने दिलेला शब्द पाळावा तसेच सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, वीज बिले दुरुस्त करा अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा दिला. त्या वेळी मेहकर भारतीय जनता पार्टीचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लश्कर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, प्रदीप इलग, अक्षद दीक्षित, माजी नगर अध्यक्ष अशोक अडेलकर, संदीप साखळकर, आजीममामु जहांगीरदार, रवी इगवे, विलास परमाळे, सुरेश निकस, रंजनीकांत कांबळे, शालिनी बुंदे, कमल गायकवाड, सागर बाजड, बलिराम राठौड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)