स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:07 PM2020-08-26T12:07:23+5:302020-08-26T12:07:41+5:30
जिल्ह्यातील काही तुल्यबळ मोहरे गळा लावण्याचे प्रयत्न होत असून भाजपनेही एक प्रकारे मिशन बिगीन अनेक सुरू केल्याचे चित्र आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून त्यानुषंगाने भाजपने पक्षांतर्गत पायाभरणीस प्रारंभ केला असून आगामी एक ते दीड वर्षाच्या काळात त्यानुषंगाने जिल्ह्यातील काही तुल्यबळ मोहरे गळा लावण्याचे प्रयत्न होत असून भाजपनेही एक प्रकारे मिशन बिगीन अनेक सुरू केल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसामधील राजकीय घडामोडी पाहता भाजपचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील काही संस्था, बाजार समित्यांच्याही आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना तुर्तास विराम देण्यात आला असला तरी कोरोनाच्या संसर्गाच्या काळात लॉकडाऊन नंतर मिशन बिगीन प्रारंभ झाले असून भाजपनेही राजकीय खेळी करत पक्षात तुल्यबल राजकीय नेत्यांच्या प्रवेशास प्रारंभ केला आहे. या निमित्त ठरले ते शिवसेना व्हाया वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करत बुलडाण्याचे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले माजी आ. विजयराज शिंदे यांच्या भाजप प्रवेशाचे.
मात्र या काळात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भाजपने राजकीय खेळ््या जिल्हयात सुरू केल्या आहे. २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले व तीनदा आमदार राहलेले विजयराज शिंदे यांच्या रुपाने भाजपने बुलडाण्यात एक तुल्यबळ व्यक्ती गळाला लावला आहे. मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे व जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत माजी आ. विजयराज शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजप करीत असावी असा जाणकारांचा होरा आहे. या माध्यमातून भाजप आणि माजी आ. विजयराज शिंदे यांचेही मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याचे चित्र आहे.