मोटारसायकल रॅली काढून भाजपचे हल्लाबोल आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:46+5:302021-02-06T05:05:46+5:30
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली येथे मोटारसायकल रॅली आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ...
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली येथे मोटारसायकल रॅली आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता खामगाव चौफुली येथून ही रॅली काढण्यात आली. रॅली वीज कार्यालयात पोहोचल्यानंतर वीजतोडणी विरोधात नाराजी वक्त करून निषेध करण्यात आला. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आ. महालेंनी वीज कंपनीच्या कार्यालयास टाळा ठोकल्यानंतर महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळामध्ये सरासरी वीज बिलाच्या नावावर भरमसाठ बिले देऊन ग्राहकांची लूट करण्याचा डाव रचलेला आहे. याविरोधात यापूर्वी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी वाढीव वीज बिले माफ करण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यानी दिले होते. मात्र, आघाडी सरकारच्या म्होरक्यांनी घूमजाव करत वाढीव बिले माफ करण्याऐवजी सक्तीच्या वसुलीचे आदेश देऊन विद्युत ग्राहकांची लूट चालविली असल्याची टीका आ. महालेंनी केली. वाढीव वीज बिले भरू नयेत, असे आवाहन आ. महाले यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, रामदास देव्हडे, अॅड. मंगेश व्यवहारे, पं.स. सभापती सिंधू तायडे, उपनगराध्यक्षा वजिराबी शे. अनिस, उपसभापती शमशादबी पटेल, महिला आघाडीच्या द्वारका भोसले, सुभाषअप्पा मंगरूळकर, शे. अनिस. प्रा. डॉ. राजू गवई, बंडू कुलकर्णी, अनुप महाजन, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, विजय नकवाल, संजय आतार, दिलीप डागा, संजय महाले, पं.स. सदस्य जितेंद्र कलंत्री, अॅड. सदार, प्रा. वीरेंद्र वानखेडे, बाळासाहेब हांडगे, पंजाबराव धनवे, अनमोल ढोरे, विजय खरे, शैलेश सोनुने, बळीराम सपकाळ, रमेश सोळंकी, भगवान सोळुंके, विजय देशमाने, गजू परिहार, श्याम पाटील, किशोर जामदार, सुमंता मोरे आदींसह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.