माेताळा येथे भाजपचे रास्ता रोको आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:44+5:302021-06-27T04:22:44+5:30
राज्यातील आघाडी सरकारच्या बेपर्वाईने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ते कायम राहिले पाहिजे. उद्या शिक्षण व नोकरीतील आरक्षण ...
राज्यातील आघाडी सरकारच्या बेपर्वाईने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ते कायम राहिले पाहिजे. उद्या शिक्षण व नोकरीतील आरक्षण सुद्धा जावू शकते. यामुळे ओबीसी समाज प्रवर्ग अस्वस्थ झाला आहे. ओबीसी प्रवर्गाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. यासाठी हे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात तालुक्यातील शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. यावेळी विविध घाेषणा देण्यात आल्या. पाेलिसांनी आंदाेलनादरम्यान चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता. आंदोलनात तालुका भाजप अध्यक्ष यशवंतराव पाटील, एकनाथ पाटील, माजी तालुकाध्यक्ष मनोहरराव नारखेडे, नामदेवराव धोटे, डॉ.अशोक गोंड, निनाजी घनोकार, विशाल व्यवहारे, देवीदास वानखेडे, जि. प. सदस्य निरंजन वाढे, गजानन घोंगडे, मंगेश क्षीरसागर, रमेश बोरसे, पूनमताई जयस्वाल, पुरुषोत्तम नारखेडे, गजानन मातडे, दिलीप येरवाड, रामेश्र्वर गव्हाड, गोपाल राव घनोकार, अमोल रुमाले, फकिरा चित्ते, प्रभंजय पाटील, प्रमोद जोशी, ज्ञानदेव हरमकार, बिहारी चोपडे, सुरेश सराग, बळीराम अंभोरे, नीलेश मऱ्हे, भानुदास किन्होळकर, पिंकेश चव्हाण, ज्ञावदेव खंडागळे, भागवत पव्हणे, नरेंद्र सिंह राजपूत, ज्ञानदेव जंगले, हरेश जयस्वाल, डॉ. विरेंद्रसिंह राजपूत, सोपान जुनारे, उमेश वाघ, प्रफुल्ल जवरे, उमेश दळवी आदींसह इतरांनी सहभाग घेतला.