६५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा वरचष्मा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:17+5:302021-01-19T04:36:17+5:30

चिखली : चिखली मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा विचारसरणीचे सदस्य निवडून आल्याचे तसेच मतदार संघात एकूण ...

BJP's supremacy over 65 gram panchayats! | ६५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा वरचष्मा !

६५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा वरचष्मा !

Next

चिखली : चिखली मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा विचारसरणीचे सदस्य निवडून आल्याचे तसेच मतदार संघात एकूण ७५ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व तर २० ग्रामपंचायतीवर मित्रपक्ष व सदस्यांच्या सहकार्याने असे एकूण ६५ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा, आमदार श्वेता महाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

चिखली मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालाचा ८० टक्के कौल ग्रामीण जनतेने भाजपच्या बाजूने दिला असल्याचा दावा आ. श्वेता महाले यांनी केला आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील तोरणवाडा, पळसखेड दौलत, कवठळ, शेलोडी, नायगाव बु., वाडी ब्रह्मपुरी, ईसोली, कोलारा, भोरसा भोरसी, येवता, दहिगाव, टाकरखेड हेलगा, करवंड, वळती, गोदरी, शिंदी हराळी, सोमठाणा, दिवठाणा, किन्होळा, वैरागड, शेलुद, सवणा, वाघापूर, हरणी, धोत्रा भणगोजी, चांधई अविरोध, मालगनी अविरोध, आमखेड, मुरादपूर बुलडाणा तालुक्यातील धाड, रायपूर, कुंभेफळ, दुधा, साखळी, माळवंडी, सिंदखेड मातला अविरोध, केसापूर, पळसखेड भट, भडगाव, पांगरी, वरुड, डोमरुळ, म्हसला बु., दहिद खु., अटकळ, सावळी या ठिकाणी जनमताचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला मिळाला असल्याचा दावा आ. महाले यांनी केला आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या धाड, ईसोली, सवणा, कोलारा, रायपूर, साखळी बु., करवंड या ग्रामपंचायतीवर भाजपचे सदस्य मोठ्या प्रमाणावर निवडून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नवनिर्वाचित सदस्यांचा पक्षाच्या वतीने आ. महाले व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, रामकृष्ण शेटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नगरसेवक विजय नकवाल, नामु गुरुदासानी, गोपाल देव्हडे, ममता बाहेती, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, अनुप महाजन, सुभाषआप्पा झगडे, मंगला झगडे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, सिद्धेश्वर ठेंग, स्वीय सहायक सुरेश इंगळे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP's supremacy over 65 gram panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.