खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:36 PM2018-01-02T13:36:01+5:302018-01-02T13:37:32+5:30

खामगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात २ जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी निषेध नोंदविला. 

Black days covered by IMA in Khamgaon, Nandura and Jalgaon Jamod talukas | खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस 

खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस 

Next
ठळक मुद्देदेशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभाग सुद्धा सहभागी झाला आहे. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

खामगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात २ जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी निषेध नोंदविला. 
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक संसदेत पारित होत आहे. वर्तमान स्थितीतील विधेयकाला आयएमए ने विरोध दर्शवला आहे. देशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभाग सुद्धा सहभागी झाला आहे. विभागातील १३८ डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. विनोद राजनकर, डॉ. बावस्कर, डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

का आहे विधेयकाला विरोध !
 हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढेल.
  वैद्यकीय महाविद्यालयाच्या फी वर ४० टक्के पर्यंत जागावर शासनाचा निर्बंध राहील. ६० टक्के जागांबद्दल व्यवस्थापनाला अधिकार राहील. फी भरमसाठ वाढवण्यात येईल. 
 दंडाद्वारे आकारण्यात येणारी रक्कम ५ कोटी १०० कोटी राहू शकते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आहे. 
  आयोगात फक्त ५ राज्यांचे प्रतिनिधित्व राहील. उर्वरीत २५ राज्ये दुर्लक्षीत राहतील.

Web Title: Black days covered by IMA in Khamgaon, Nandura and Jalgaon Jamod talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.