लॉकडाऊन रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:39+5:302021-04-07T04:35:39+5:30

लॉकडाऊनचा आदेश देताना शासनाने गोरगरीब जनतेचा विचार केला नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला. मागील वर्षी केलेल्या लाॅकडाऊनमुळे ...

Block the path of the deprived Bahujan Front to cancel the lockdown | लॉकडाऊन रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

लॉकडाऊन रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

Next

लॉकडाऊनचा आदेश देताना शासनाने गोरगरीब जनतेचा विचार केला नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला. मागील वर्षी केलेल्या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आतापर्यंत अनेकांची आर्थिक स्थिती सुधारू शकली नाही. आता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत असल्याने सर्वसामांन्याचे हाल होतील. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला लॉकडाऊनचा हा नविन आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष श्रीकांत जाधव, बाळासाहेब वानखेडे, रमेशसिंग राजपूत, अर्जुन खरात, गाडेकर, विजय राऊत, दिलीप राजभोज, शंकर मलवार, मिलींद वानखेडे, सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Block the path of the deprived Bahujan Front to cancel the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.