लाेणार येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:08+5:302020-12-25T04:28:08+5:30
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून, संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. याबाबत शासनाने पत्र पाठवले होते. त्या आनुषंगाने ...
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून, संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. याबाबत शासनाने पत्र पाठवले होते. त्या आनुषंगाने प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र / भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र / भारत अभियानाचे अध्यक्ष विठ्ठलराव जाधव उपस्थित होते. रक्त संकलन करण्यासाठी अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालय येथील रक्त संकलन अधिकारी डॉ. जोशी यांच्या पथकाला आमंत्रित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १३ बॉटल रक्त संकलित करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील प्रा. डॉ. महेंद्र भिसे, अनिल बनमेरू व प्रकाश गवई यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवशंकर मोरे यांनी परिश्रम घेतले.