गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:32+5:302021-03-07T04:31:32+5:30
शुक्रवारी सकाळी श्रींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन ॲड. अनंतराव वानखेडे, भाई कैलास सुखदाने, कलीम ...
शुक्रवारी सकाळी श्रींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन ॲड. अनंतराव वानखेडे, भाई कैलास सुखदाने, कलीम खान यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यजित परिवार, श्री शिवाजी शिक्षण संस्था, मातोश्री एज्युकेशन परिवार, ॲड. अनंतराव वानखेडे मित्रमंडळ, यासीन कुरेशी मित्रमंडळ, कलीम खान मित्रमंडळ, वैभव उमाळकर युवा मंच, वसीम कुरेशी मित्रमंडळ, व्यापारी मंडळी, काँग्रेस महिला आघाडी तसेच सर्व स्तरातील विविध नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार डॉ. संजय गरकल, वैद्यकीय अधिकारी ठोंबरे यांनी शिबिरास भेट दिली. सायंकाळी सात वाजता ॲड. किरण सरनाईक यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदेश लोढे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भूषण भैया देशमुख, तर आभार प्रदर्शन घनश्याम जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, रवी अग्रवाल, विष्णुपंत पाखरे, संपतराव देशमुख, गजानन तात्या कृपाळ, सुरेश मुंदडा, बाळासाहेब सावजी, भूषण मिनासे, स्वाती पऱ्हाड, आरती दीक्षित, सत्यजित परिवार, शिवाजी शिक्षण संस्था, मातोश्री एज्युकेशन संस्था, श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे विश्वस्त हजर होते. श्रींचा प्रकट दिन हा शासनाचे सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.