रक्तदानामुळे गरजूंना जीवनदान मिळते - सुनील देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:24+5:302021-05-03T04:29:24+5:30

चिखली : आपल्या पवित्र व अनमोल रक्तदानामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णास जीवनदान मिळते. विशेषत: तरुण-तरुणींनी सामाजिक दायित्व समजून व ...

Blood donation gives life to the needy - Sunil Deshmukh | रक्तदानामुळे गरजूंना जीवनदान मिळते - सुनील देशमुख

रक्तदानामुळे गरजूंना जीवनदान मिळते - सुनील देशमुख

Next

चिखली : आपल्या पवित्र व अनमोल रक्तदानामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णास जीवनदान मिळते. विशेषत: तरुण-तरुणींनी सामाजिक दायित्व समजून व सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात व जिल्ह्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता लस घेण्याच्या अगोदर किंवा लस घेतल्यानंतर ६० दिवसांनी आरोग्य प्रशासनास एक हात मदतीचा ही भावना ठेवत मोठ्या संख्येने रक्तदान हे केले पाहिजे. रक्तदान ही जनसामान्यांची सेवा आहे. यालाच ईश्वरसेवा आपण म्हणू शकतो, असे आवाहन अ‍ॅड. सुनील देशमुख यांनी केले.

आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील हसनराव देशमुख यांच्या सेवा संपर्क कार्यालय येथे २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. देशमुख यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात आमदार श्वेता महाले यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार डॉ. संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती अ‍ॅड. देशमुख यांनी यावेळी दिली. जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, जाधव, बुलडाणा पं.स. सदस्य संदीप पाटील उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले. यशस्वितेसाठी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, भाजपा तालुका सरचिटणीस जितेंद्र जैन, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र तायडे, तालुका कोषाध्यक्ष किरण सरोदे, धाड शहराध्यक्ष विशाल विसपुते, भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण पाटील धंदर, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील पालकर, शालिग्राम कानडजे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. संतोष खेडेकर, अरुण भोंडे, बबन सुसर, संदीप शेळके, सिद्धू लडके, राजू अपार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष गोपाल पाटील तायडे, मयूर पडोळ, अर्जुन पाटील लांडे, कृष्णा गोराडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation gives life to the needy - Sunil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.