रक्तदान महायज्ञास प्रारंभ, ५१ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 11:42 AM2021-07-03T11:42:08+5:302021-07-03T11:42:15+5:30
Lokmat Blood donation Mahayagya started : राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार पासून रक्तदान महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला. राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मा. आ. हर्षवर्धन सपकाळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तथा स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून या शिबारास प्रारंभ झाला. लोकमत परिवार आणि जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये पहिल्या दिवशी २१ जणांनी रक्तदान केले. दरम्यान ‘लोकमत’ने २जुलै ते १५ जुलै पर्यंत आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या संकट काळात रुग्णांची गरज भागविण्याचे माेलाचे काम या माध्यमातून होत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४५ लाख रुपये त्यांनी दिले होते. त्यातून आणलेल्या उपकरणाची पाहणी त्यांनी केली. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
सानंदा यांचे ६१ व्या वर्षी रक्तदान
रक्तदान महायज्ञात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी वयाची तमा न बाळगता ६१ व्या रक्तदान केले. आतापर्यंतच्या जीवनात त्यांनी तब्बल ७० पेक्षाही अधिक वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान हे पुण्यकर्म आहे. रक्तदानातून मानवी जीवनाला अमूल्य मदत करता येते. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सानंदा यांनी उपस्थित रक्तदात्यांचा सत्कार केला.