डोहात बूडालेल्या यूवकाचा मुतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 16:27 IST2021-08-09T16:27:14+5:302021-08-09T16:27:20+5:30
The body of a drowned youth was found in river : डोहात रात्री शोध मोहीम राबवून अकरा वाजताच्या सूमारास यूवकाचा मुतदेहाला डोहाच्या बाहेर काढण्यात आला.

डोहात बूडालेल्या यूवकाचा मुतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूरः- आडनदी पात्रातील डोहात १९ वर्षीय यूवकाचा बूडून अंत झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान धडली होती. नदीच्या डोहात रात्री शोध मोहीम राबवून अकरा वाजताच्या सूमारास यूवकाचा मुतदेहाला डोहाच्या बाहेर काढण्यात आला.
रविवारी वारी हनूमान येथील हनूमान मंदीराजवळील आडनदी पात्रातील डोहात नांदूरा तालुक्यातील अलमपूर येथील १९ वर्षीय वैभव बढे आंघोळीसाठी गेला होता. मात्र तो डोहात बूडाला. घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पवार, आदिवासी बिटचे बिट जमदार ललित कूंजाम, सोनाळा बिटचे सूनिल सूसर, सचिन राठोड, मंगेश लेकरूवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डोहात बुडवलेल्या युवकाला शोधण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबविल्याने रात्री अकरा वाजताच्या सूमारास बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला. सोमवारी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सोनाळा पोलिस स्टेशनला अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.