दोन विवाहित महिलेसह चिमुकलीचा मृतदेह आढळला
By admin | Published: December 12, 2014 12:44 AM2014-12-12T00:44:18+5:302014-12-12T00:44:18+5:30
देऊळगाव मही परिसरातील घटना
देऊळगाव मही (बुलडाणा): दोन विवाहित महिला व एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने देऊळगाव मही परिसरात खळबळ उडाली आहे. तिनही मृतदेहांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचखेड शिवारात एका विवाहितेचे मुलीसह मृतदेह विहीरीत आढळल्याची घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी घडली. चिंचखेड येथील दिपक वायाळ यांची पत्नी निता दिपक वायाळ (२२) व मुलगी खुशी वायाळ (१) यांचा मृतदेह परिसरातील विहिरीत सकाळी आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. त्याच प्रमाणे जवळ असलेल्या टाकळखेड भागिले येथील बेपत्ता असलेल्या एका विवाहितेचा मृतदेह ११ डिसेंबर रोजी आढळून आला. टाकळखेड भागिले येथील शिवाजी भागिले यांनी पत्नी रंजना भागिले ही १ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार ८ डिसेंबर रोजी देऊळगावमही पोलिस स्टेशनला दिली होती. पोलिस तपास सुरु असतांना मेव्हनाराजा शिवारात शेतातील ओढय़ात सदर विवाहितेचा मृतदेह ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृ त्यूची नोंद केली आहे.