तरवाडीत युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:47+5:302021-07-17T04:26:47+5:30
बाेराखेडीत बालकांना दिली लस माेताळा : तालुक्यातील बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान बालकांना न्यूमोकोकल काँजुगेट व्हॅक्सिनचा १२ जुलै ...
बाेराखेडीत बालकांना दिली लस
माेताळा : तालुक्यातील बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान बालकांना न्यूमोकोकल काँजुगेट व्हॅक्सिनचा १२ जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. ही लहान बालकांची लस बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या सर्व उपकेंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पाणी पाझरल्यामुळे पिकांचे नुकसान
सिंदखेडराजा : पावसाचे पाणी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाझरल्याने जवळपास २० एकरामधील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राहेरी शिवारात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी येथील बाधित शेतकऱ्यांची केली आहे.
अमाेल इंगळे यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेमार्फत राज्यातील बुद्धिबळ पंचांना रिफ्रेश ट्रेनिंग व नवीन पंचांना रिफ्रेश ट्रेनिंग व पंचांना आधुनिक अद्ययावत ट्रेनिंग देण्यासाठी २८ व २९ मे रोजी दोन दिवसीय ऑनलाइन बुद्धिबळ पंच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान केंद्राच्या वतीने मार्गदर्शन
बुलडाणा : मान्सूनचा लहरीपणा थांबून त्याच्या सक्रियतेचे दर्शन गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने दिसून आले. कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी १५ जुलै राेजी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
मासरुळ परिसरात मुसळधार पाऊस
मासरुळ : मासरुळ परिसरामध्ये १५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले होते.