बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:31 AM2021-01-22T04:31:50+5:302021-01-22T04:31:50+5:30
लाभार्थी कुठल्या योजनेचे किती संजय गांधी योजना - ३८३४१ श्रावणबाळ योजना - ९२४५२ इंदिरा गांधी योजना ५०८४१ संजय गांधी ...
लाभार्थी कुठल्या योजनेचे किती
संजय गांधी योजना - ३८३४१
श्रावणबाळ योजना - ९२४५२
इंदिरा गांधी योजना ५०८४१
संजय गांधी निराधार अनुदान योजना
बुलडाणा जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी ३८ हजार ३४१ आहेत. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना अनुसुचित जातीचे ९ हजार ११९, अनुसुचित जमातीचे ८२४ आहेत.
श्रावणबाळ योजना
श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ९२ हजार ४५२ लाभार्थी असून, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुसुचित जातीचे २३ हजार ८९, अनुसुचित जमातीचे २ हजार १२९ लाभार्थी आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ५० हजार ८४१ लाभार्थी आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचे ७०७, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे २ हजार २५४ लाभार्थी आहेत.
संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वेळीच देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बोगस लाभार्थी असेल, त्यांची चौकशी करण्याच्या सुचना तहसील स्तरावर देण्यात आलेल्या आहेत.
अश्विनी जाधव, संजय गांधी योजना विभाग, बुलडाणा.