बोगस कीटकनाशक जप्त

By admin | Published: October 28, 2016 02:39 AM2016-10-28T02:39:12+5:302016-10-28T02:39:12+5:30

बोगस कीटकनाशकाच्या बाटल्या कृषी विभागाने गुरुवारी दुपारी जप्त केल्या.

Bogus insecticide seized | बोगस कीटकनाशक जप्त

बोगस कीटकनाशक जप्त

Next

लोणार, दि. २७- सोयाबीन, तूर हरभरा यासारख्या पिकांवर किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी वा परण्यात येणार्‍या बोगस कीटकनाशकाच्या ६0 हजार रुपये किमतीच्या बाटल्या कृषी विभागाने गुरुवारी दुपारी जप्त केल्या.
पिकांवर पडणार्‍या वेगवेगळय़ा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पिकांवर मोठय़ा प्रमाणात फवारण्यात येणार्‍या डयुपॉट कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकाच्या १५0 आणि ३0 मिलीच्या १00 बोगस बाटल्या तळणी येथील प्रसाद कृषी केंद्राचे संचालक गजानन विष्णू सरकटे यांच्या बोलेरो गाडीतून संशयास्पदरीत्या आढळून आल्या. त्यामुळे समाधान राजगुरु यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने कारवाई केली. तळणी ता.मंठा जि. जालना येथील प्रसाद कृषी केंद्राचे संचालक गजानन विष्णू सरकटे हे २ वाजताच्या दरम्यान आपल्या एम.एच.२४ व्ही ४२७७ बोलेरो गाडीतून किराणा सामान खरेदी करण्यासाठी आले असता सरकटे यांनी आपली गाडी लोणी रोडवरील बनमेरु यांच्या किराणा दुकानासमोर उभी करत असताना त्यांच्या गाडीतील बॉक्समधून डयुपॉट कंपनीचे कोराजन कीटकनाशकाच्या काही बाटल्या खाली पडल्या. या बाटल्या येथील डयुपॉट कोराजन कीटकनाशकाचे अधिकृत विक्रेता समाधान राजगुरु यांच्या दृष्टीस पडल्या. हे कीटकनाशक बोगस असल्याचा संशय समाधान राजगुरु यांना आला. त्यांनी याबाबत पं.स.चे कृषी अधिकारी पथाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पाहणी केली असता कीटकनाशक बोगस असल्याचे आढळून आले. यावेळी पथाडे यांना सरकटे यांनी आपल्या तळणी येथील प्रतिष्ठानचे नाव जमुनागीर बाबा कृषी केंद्र असल्याचे सांगितले. तसेच हे बोगस डयुपॉट कोराजन कीटकनाशक औरंगाबाद येथील नवा मोंढा स्थित कल्पेश कृषी केंद्रावरून खरेदी केल्याचे सांगितले. सदर कृषी केंद्राबाबत औरंगाबाद याठिकाणी चौकशी केली असता नवा मोंढय़ात कल्पेश कृषी केंद्र नावाचे दुकानच नसल्याचे समजले. दुपारी २ वाजता घडलेल्या या घटनेमध्ये सायंकाळी ७ वाजता कारवाई करण्यात आली. त्यांनी पंचनाम्यात गजानन सरकटे यांच्या प्रतिष्ठानाचे नाव प्रसाद कृषी केंद्र दा खविले, तर ज्या दुकानावरून बोगस कीटकनाशक खरेदी केले, ते दुकान औरंगाबादऐवजी जालना येथील दाखविले.

कृषिमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
या प्रकाराची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सदर बोगस कीटकनाशकाच्या बाटल्या गाडीसह ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे निर्देश कृषी अधिकार्‍यास दिले. मात्र, कृषी अधिकारी पथाडे यांनी कृषिमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कारवाई करण्यास विलंब केला. तसेच पंचनाम्यात फेरफार केला.

Web Title: Bogus insecticide seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.