बोंडअळीने नुकसान नवे, मदत जुनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:47 PM2018-09-26T17:47:07+5:302018-09-26T17:47:19+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात सध्या कपाशी पिकावर बोंडअळीने डोकेवर काढले असून अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. परंतू आतापर्यंत मागील वर्षी झालेल्या नुकसानाचीच भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे.

Bolworm damages new, help old! | बोंडअळीने नुकसान नवे, मदत जुनी!

बोंडअळीने नुकसान नवे, मदत जुनी!

Next

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात सध्या कपाशी पिकावर बोंडअळीने डोकेवर काढले असून अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. परंतू आतापर्यंत मागील वर्षी झालेल्या नुकसानाचीच भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे. कपाशीचे आता पुन्हा नव्याने नुकसान होत असताना शेतकºयांना जुन्या (मागील वर्षी) नुकसानाच्या मदतीसाठी बँकेत चकरा मारव्या लागत आहेत. जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानापोटी १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयांची गरज असताना ८९ कोटी ५६ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी कपाशीचे क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर होते. परंतू कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचे कपाशी उत्पादन तोट्यात गेले. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याने काही शेतकºयांनी आपल्या शेतातील कपाशीच वखरुन टाकल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. बोंडअळीने नुकसान झालेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांना मदत व्हावी, म्हणून महसूल प्रशासनाकडून बोंडअळी नुकसानाचा सर्वे करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याकरीता १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. परंतू आतापर्यंत जिल्ह्यासाठी केवळ ८९ कोटी ५६ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. या खरीप हंगामात पुन्हा नव्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. परंतू मागील नुकसान भरपाईचीची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यासाठी अद्याप ४४ कोटी ७८ लाख ३६ हजार रुपये नुकसानभरपाईपोटी येणे बाकी असताना शेतकºयांना पुन्हा बोंडअळीचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. परंतू बँकेत त्यांच्या खात्यावर निधी जमा झालेलाच नसतो, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

एक लाख ३६ हजार शेतकºयांना नुकसानभरपाई

जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या बोंडअळी नुकसानाच्या निधीतून एक लाख ३६ हजार ८६५ शेतकºयांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यात आला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानापोटी दोन टप्प्यात ८९ कोटी ५१ लाख २८ हजार ९२१ रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुकानिहाय मदत मिळालेले शेतकरी

जिल्ह्यात आतापर्यंत मदत मिळालेल्या शेतकºयांची संख्या १ लाख ३६ हजार ८६५ आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २ हजार ७९३, चिखली तालुक्यात २ हजार ८, मोताळा २० हजार, मलकापूर १२ हजार २१८, खामगाव १३ हजार ९०७, शेगाव ७ हजार ९६१, नांदुरा १२ हजार ७२, जळगाव जा.१७ हजार ११२, संग्रामपूर ११ हजार १७१, मेहकर २ हजार १४, लोणार २ हजार ११०, देऊळगाव राजा १६ हजार ६९०, सिंदखेड राजा १६ हजार ८०९ शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला आहे.

Web Title: Bolworm damages new, help old!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.