बोंडअळी व्यवस्थापन: शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:36 PM2018-07-28T13:36:55+5:302018-07-28T13:38:15+5:30
खामगाव: कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी खामगाव कृषी विभाग कामाला लागला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषीविभागाने कालबध्द कार्यक्रम आखला असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मागील वर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकरी बांधवांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी कपाशी पेरणीपासुनच शेतकऱ्यांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणासाठी सज्ज झाले आहेत. हातातोंडासी आलेला घास बोंडअळीमुळे हिरावून घेतल्या जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागील वर्षी बी.टी. कपाशीचे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळेच शेतकºयांसह कृषी विभाग बोंडअळी नियंत्रणाकरीता विविध उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत.
तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी बोंडअळी नियंत्रणासाठी तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. मागीलवर्षी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. (प्रतिनिधी
नुकसान भरपाई तोकडी
मागील वर्षी बोंडअळीने नुकसान झाल्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. सध्या हेक्टरी ६ हजार ८०० रूपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. सदर नुकसान भरपाई तोकडी असल्याने उपाययोजना करण्यावरच शेतकरी भर देत आहेत.
शेतकºयांनी प्रति एकरी ५ कामगंध सापळे लावावे. फुलोर अवस्थेतील कपाशी पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. जेणे करून बोंडअळी नियंत्रणात राहील.
- एस.पी.पवार, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.