पुस्तकांची दहीहंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:04 AM2017-08-17T00:04:38+5:302017-08-17T00:05:17+5:30

मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली.

Books of yogurt! | पुस्तकांची दहीहंडी!

पुस्तकांची दहीहंडी!

Next
ठळक मुद्देराजश्री प्राथमिक शाळेचा उपक्रम दहीहंडीतून दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश 

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली.
दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा उपक्रम राजश्री प्राथमिक शाळेत राबविला जातो. यावर्षी  पुस्तकांची दहीहंडी फोडण्यात आली. पुस्तकांची दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधत होती. या कार्यक्रमातून सामाजिक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अजिंक्य बार्डेकर, प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप देबाजे, विजय फंगाळ होते. यावेळी शाळेत दहीहंडीला पुस्तके आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे लोगो बांधून वेगळ्या प्रकारे दहीहंडी साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी बर्‍याच विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला. यावेळी शिवप्रसाद शेळके, विकास भोसले, गणेश निकस, गणेश नवले, गोपाल होणे, मोहन धाडवे, मनिषा वानखेडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.  

Web Title: Books of yogurt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.