उतावळी नदीवरील प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान

By admin | Published: January 7, 2015 12:32 AM2015-01-07T00:32:53+5:302015-01-07T00:40:38+5:30

देऊळगाव साकर्शा येथील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली.

Boons for Farmers on Uthavali River Project | उतावळी नदीवरील प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान

उतावळी नदीवरील प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान

Next

देऊळगाव साकर्शा (मेहकर, बुलडाणा): मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी व लेंडी नदीवरील मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे शेकडो हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली आली आहे. हा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे.
देऊळगाव साकर्शा येथील उतावळी व लेंडी नदीवर सन २00५ मध्ये रॉकमॅटीक पद्धतीचा मध्यम पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी तथा सुरुवात २00२ मध्ये करण्यात आली होती. तर २00५ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पाकरिता शासनाने सुमारे ५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. या प्रकल्पासाठी १७.५0 कि.मी. लांबीचा उजवा मुख्य कालवा असून, पाणी वितरण प्रणालीमधून मेहकर तालुक्यामधील २६५ हेक्टर तर पातूर तालुक्यातील १३५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येत आहे. उतावळी प्रकल्पामध्ये १९.७९ दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून, एकही गाव पुनर्वसन करण्यात आले नाही.
यावर्षी अपुरा पाऊस असूनही गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्पाची लेवल ५0 से.मी वाढली आहे; तसेच प्रकल्पामध्ये एकूण १५.७९ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची पातळी आहे. उतावळी प्रकल्पामुळे गावातील ज्या शेतकर्‍यांना फायदा झाला नाही, अशा शेतकर्‍यांनी स्टेट बँक शाखा जानेफळ यांची सहाय्यता घेऊन ६ टक्के राखीव उपसा सिंचनामध्ये सुमारे १२0 हेक्टर जमीन सिंचन होत असून, कधी सिंचन न होणार जमीनही सिंचनाखाली येत असल्याने येथील बळीराजा सुखावला आहे.

Web Title: Boons for Farmers on Uthavali River Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.