पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी दोन्ही राजेंची लागणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:26+5:302021-02-06T05:05:26+5:30

यावेळी खा. उदयनराजे भोसले व खा. संभाजीराजे भोसले यांनी हे आमंत्रण स्वीकारताना या कार्यक्रमात उपस्थितीसाठी आपणाला आनंद होईल, असे ...

Both kings will have to attend the ground worship of the statue | पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी दोन्ही राजेंची लागणार हजेरी

पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी दोन्ही राजेंची लागणार हजेरी

Next

यावेळी खा. उदयनराजे भोसले व खा. संभाजीराजे भोसले यांनी हे आमंत्रण स्वीकारताना या कार्यक्रमात उपस्थितीसाठी आपणाला आनंद होईल, असे मत व्यक्त करीत हे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. शहरात

२२ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने ७१ फुटांचे शिवस्मारक बुलडाणा शहरामध्ये संगम चौकामध्ये होऊ घातले आहे. पुतळ्याचे नियोजित जागेत भूमिपूजन करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या परिसरातील अतिक्रमण व त्याठिकाणी उभी करण्यात आलेली भिंत पाडून स्वच्छता करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून संगम चौक परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे नियोजन सुरू होते, मात्र, त्यांना यात यश मिळत नव्हते. ही बाब शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांच्या दरबारी मांडल्यावर त्यांनी तात्काळ याविषयी दखल घेत वरिष्ठ स्तरावर मंजुरी मिळवून दिली. याबाबतचा आदेश त्यांनी नुकताच समितीच्या स्वाधीन केला आहे. आता शिवजयंतीच्या दिवशीच शहरातील संगम चौक या ठिकाणी भूमिपूजन करण्याचे आश्‍वासन आ. गायकवाड यांनी दिले होते. हे भूमिपूजन ऐतिहासिक होईल, असे आश्‍वासनदेखील दिले होते.

शिवप्रेमींमध्ये उत्साह

कार्यक्रमासाठी त्यांनी दोन राजेंना आमंत्रण दिल्याने जिल्ह्यातील शिवप्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी खा.

उदयनराजे व खा. संभाजीराजे भोसले यांनी मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा हे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचे माहेर आहे. त्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा पुतळा उभारला जाणार आहे. ही अभिमानास्पद बाब असून यातून शिवप्रेमींना मोठी ऊर्जा मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Both kings will have to attend the ground worship of the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.