गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

By admin | Published: August 14, 2015 11:46 PM2015-08-14T23:46:16+5:302015-08-14T23:46:16+5:30

बुलडाणा शहरातील दोन वेगवेगळय़ा घटना.

Both of them committed suicide by hanging themselves | गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

Next

बुलडाणा : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. यामध्ये एका युवकाचा आणि एका महिला डॉक्टराचा समावेश आहे. शहरातील प्रसिद्ध व्यापारी ओम अग्रवाल यांची मुलगी डॉ. प्रणिता हिचा विवाह यवतमाळ येथील सचिन भारूका यांच्याशी झाला होता. प्रणिता ही गर्भवती होती. ती काही दिवसांपूर्वीच वडिलांकडे आली होती. १४ ऑगस्ट रोजी डॉ. प्रणिता हिने वडिलांच्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दुसर्‍या घटनेत सुंदरखेड स्थित विजयनगर येथील २४ वर्षीय प्रफुल्ल गजानन सरकटे याने राहत्या घरी शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Both of them committed suicide by hanging themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.