मतदानावर बहिष्कार

By Admin | Published: October 2, 2014 11:35 PM2014-10-02T23:35:23+5:302014-10-02T23:35:23+5:30

मेरा ग्रामस्थांचा इशारा: विविध मागण्यांकडे दूर्लक्ष

Boycott of voting | मतदानावर बहिष्कार

मतदानावर बहिष्कार

googlenewsNext

चिखली (बुलडाणा) : गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात यावी, विद्युत सबस्टेशन देण्यात यावे तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यात यावी या केवळ तीन जिवनावश्यक मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी याकडे दूर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील सुमारे १0 हजार लोकवस्तीच्या मेरा बु. ग्रामस्थांनी येत्या १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंदखेडराजा मतदार संघात समाविष्ट असलेले चिखली तालुक्यातील मेरा बु. या गावात मुलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. येथील लोकसंख्या सुमारे १0 हजारपर्यंत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, सेवानवृत्त व वृध्दांसाठी बँकेच्या व्यवहारासाठी बाहेरगावी जावे लागत त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भूर्दंंडासह त्रास सोसावा लागत असल्याने येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असावी यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी रिझर्व बँक, एस.एल.बी.सी, जिल्हा अग्रणी बँक यांच्याकडे मागणी लावून धरली आहे. तसेच गावातील विद्युत पुरवठाही अनियमित असल्याने पाणी असूनही िपकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून शेतकर्‍यांचे नुकसान होत असून विद्यार्थ्यांंचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याने येथे विद्युत सबस्टेशन देण्यात यावे. तर गावात पाणीपुरवठा व्यवस्थेअभावी येथील नागरीकांना दररोज तीन किमी पायपीट करून पाणी आणावे लागते ते सुध्द अशुध्द असल्याने गावात रोगराई वाढली आहे. ग्रामस्थांच्या उपरोक्त मागण्या रास्त व सहज पूर्ण हो तील अशा असतानाही वेळोवेळी शासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. शिवाय ज्या लोकप्रतिनिधींना यांनी निवडून दिले आहे त्यांचेही ग्रामस्थांकडे साफ दूर्लक्ष असल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा ग्रामस्थांनी यापूर्वीच दिला होता. त्याचाही कुठलीच दखल न घेतल्याने मेरा ब.वासीयांनी येत्या १५ ऑक्टोबरला मतदान न करण्याचा ठराव घेतला आहे.

Web Title: Boycott of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.